ई-कॉमर्स वेबसाइट्स ॲमेझॉन आणि फ्लिपकार्ट यांचा प्रजासत्ताक दिनानिमित्त बंपर डिस्काउंट सेल

ई-कॉमर्स वेबसाइट्स ॲमेझॉन आणि फ्लिपकार्ट यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त त्यांच्या सेल इव्हेंट्सची घोषणा केली आहे.17 जानेवारी ते 20 जानेवारी दरम्यान Amazon वर ग्रेट रिपब्लिक डे सेल होणार आहे, तर Flipkart चा बिग सेव्हिंग डे सेल 17 ते 22 जानेवारी दरम्यान सुरु राहाणार आहे. नेहमीप्रमाणेच, ॲमेझॉन प्राइम मेंबर्स आणि फ्लिपकार्ट प्लस मेंबर्सना सामान्य ग्राहकांच्या 24 तास आधी या सेलमध्ये मिळणाऱ्या ऑफर्स पाहाता येणार आहेत
हा सेल येत्या 17 जानेवारीला सुरू होईल आणि 20 जानेवारी पर्यंत चालणार आहे. याचा अर्थ Amazon प्राइम मेंबर्स 16 जानेवारीला डील आणि ऑफर पाहू शकणार आहेत.

तुम्हाला या सेलमध्ये SBI क्रेडिट कार्ड्सवर 10 टक्के इंस्टंट डिस्काउंट देण्यात येईल. तसेच लोक वेगवेगळ्या स्मार्टफोन्सवर बंपर डिस्काउंट देखील मिळवू शकतात. तुम्हाला इलेक्ट्रॉनिक गॅझेटवर 70 टक्के आणि ऑटोमोटिव्ह वस्तूंवर 60 टक्क्यांपर्यंत डिस्काउंट मिळू शकतो.

तसेच वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार Boat Watch Matrix, Samsung Galaxy Tab A8, and Boat Airdopes 181 earbuds हे या सेलमध्ये लॉन्च केले जातील.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button