संगमेश्वर बाजारपेठत वाहतूक कोंडी
संगमेश्वर बाजारपेठेत उभ्या असलेल्या वेड्या वाकड्या वाहनांमुळे वाहतूक कोंडी होत असल्याने ग्राहकांनी नाराजी व्यक्त केली आहे. वेड्या वाकडी वाहने उभी ठेवून वाहतूक कोंडी करणाऱ्यांवर त्वरित कारवाई करण्यात यावी अशी मागणी ग्राहकांकडून करण्यात येत आहे. तसेच आठवडा बाजाराच्या दिवशी अवघड वाहनांमुळे वाहतूक कोंडी होत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.संगमेश्वर बाजारपेठ ही मध्यवर्ती बाजारपेठ म्हणून ओळखली जाते. परंतु या बाजारपेठेमध्ये मोठ्या वाहनांसह छोटी वाहने वेडी वाकडे लावलेले असतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. ग्राहकांना तसेच पादचारी वर्गांना वाहतूक कोंडी मध्ये अडकून राहावे लागते. www.konkantoday.com