*महाविकास आघाडीच्या बैठकीची तारीख बदला, ‘वंचित’चं पुन्हा दबावतंत्र !*
_____27 फेब्रुवारीला महाविकास आघाडीची मुंबई येथे बैठक होणार आहे. या बैठकीचे निमंत्रण वंचित बहुजन आघाडीला देण्यात आले आहे. मात्र, या बैठकीची तारीख बदलावी, अशी विनंती प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीकडे केली आहे.27 फेब्रुवारीला होणारी बैठक 28 फेब्रुवारी रोजी घेण्याची मागणी आंबेडकर यांनी केली आहे. दरम्यान, त्यांच्या या मागणीमुळे ‘वंचित’कडून पुन्हा दबावतंत्राचा वापर होत असल्याची चर्चा होऊ लागली आहे.वंचितचा महाविकास आघाडीत समावेश झाला असला तरी अद्यापही जागावाटपाचे ठरलं नसल्याने काल धैर्यवर्धन पुंडकर यांनी पक्षाची भूमिका मांडली. महाविकास आघाडीच्या चारपैकी दोनच बैठकांना आम्हाला बोलावलं असल्याचा दावा त्यांनी केला होता, तर वंचितला महाविकास आघाडी घटक पक्ष समजत नाही का, असा सवालही करण्यात आला आहे.www.konkantoday.com