
कोरोना संकटातही ऑनलाइन शिक्षणाद्वारे दि यश फाउंडेशन नर्सिंग कॉलेजचा अभ्यासक्रम 90 टक्के पूर्ण
कोरोना (कोविड-19) महामारीमध्ये दि यश फाउंडेशन कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये ऑनलाइन शिक्षण दिले जात आहे. त्यानुसार या शिक्षणाचा फायदा कॉलेजमधील सुमारे 65 टक्के विद्यार्थी घेत आहेत. या उपक्रमामुळे आजवर विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम सुमारे 90 टक्के पूर्ण झाला आहे. यंदा 100 विद्यार्थी येथून अंतिम परीक्षा देऊन आरोग्य सेवेत दाखल होणार आहेत.
मेडिकल, पॅरामेडिकलमधील योद्धे
कोरोनामुळे सध्या भारतात तिसर्या टप्प्यातील लॉकडाऊन चालू आहे. या कालावधीत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, याकरिता ऑनलाइन अभ्यासक्रम पूर्ण करण्याची सूचना नाशिकच्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने कॉलेजला दिली. कोरोनाच्या संकटातही मेडिकल व पॅरामेडिकल अभ्यासक्रम पूर्ण होणे आवश्यक आहे. कारण हे विद्यार्थी आरोग्य सेवेत दाखल होणार आहेत. कोरोना व संभाव्य आरोग्य संकटात हे योद्धे रुग्णांना वाचवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणार आहेत. कोरोना हे जागतिक महामारी जाहीर झाल्याने मेडिकल व पॅरामेडिकल सेवा भारतासह सर्वच देशांना अधिक सक्षम करावी लागणार आहे. आधुनिक उपचार, प्रशिक्षित मनुष्यबळासाठी गरज आहे.
27 एप्रिलपासून सुरवात
विद्यापीठाच्या सूचनेनुसार 27 एप्रिलपासून ऑनलाइन लेक्चर्स सुरू झाली. त्यात मायक्रोबायोलॉजी, फाउंडेशन ऑफ नर्सिंग, अॅनॉटॉमी व सायकॉलॉजी, न्यूट्रीशन व बायोकेमिस्ट्री हे प्रथम वर्ष बीएस्सीचे विषय शिकवले जात आहेत. मेडिकल सर्जिकल नर्सिंग, कम्युनिकेशन अँड एज्युकेशन टेक्नॉलॉजी हे द्वितीय वर्ष बीएस्सीचे विषय शिकवण्यात येतात. तृतीय वर्ष बीएस्सीचे चाईल्ड हेल्थ नर्सिंग, मेडिकल सर्जिकल नर्सिंग- 2 हे विषय शिकवले जातात. दररोज ऑनलाइन एक तासाचे लेक्चर झूम अॅपचा वापर करून दिले जाते. कोविड 19 च्या व्यवस्थापनासाठी विशेष मार्गदर्शनही करण्यात आले. जीएनएम कोर्सच्या मुलांचेसुद्धा ऑनलाइन क्लास घेतले जात आहेत.
सुमारे 60 ते 65 टक्के विद्यार्थी या ऑनलाइन वर्गात सहभागी होतात. लेक्चरसोबत नोट्स, पीडीएफ फाईल्स आणि पीपीटी शेअर केल्या जातात. यामध्ये प्रा. जेसन डॅनियल, प्रा. नीतू टी, प्रा. रमेश बंडगर, प्रा. किती करंबेळकर, प्रा. भक्ती महाजन, प्रा. अमेय भागवत व प्रा. सुप्रिया कोळी आदी शिक्षक घरीच राहून ऑनलाइन क्लास घेत आहेत. 90 टक्के अभ्यासक्रम पूर्ण करण्यात आला आहे. बीएस्सीची परीक्षा जूनमध्ये आणि एएनएम, जीएनएमची परीक्षा जुलैमध्ये होणार आहे. या ऑनलाइन अभ्यासक्रमामुळे विद्यार्थ्यांचा फायदा होत आहे. प्राचार्य डॉ. मीनाक्षी देवांगमठ व रजिस्ट्रार सौ. शलाका लाड यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिक्षण दिले जात आहे.
2006 पासून नर्सिंगचे शिक्षण
कोकणात दर्जेदार आरोग्य शिक्षणासाठी माजी आमदार बाळ माने यांनी 2006 पासून मिरजोळे येथील विमानतळासमोर प्रशस्त वास्तूमध्ये नर्सिंग कॉलेज सुरू केले. कोकणातील सुमारे एक हजार विद्यार्थिनी या कॉलेजमध्ये शिकून चांगल्या नोकरीला लागल्या आहेत. कोरोना संकटात विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्याकरिता ऑनलाइन शिक्षण उपयुक्त असून या उपक्रमाचे कौतुक दि यश फाउंडेशनचे व्यवस्थापकीय विश्वस्त श्री. बाळ माने, सहव्यवस्थापकीय विश्वस्त सौ. माधवी माने, विराज माने आणि मिहीर माने यांनी केले.
नवीन अभ्यासक्रमाची माहिती फोनवर
आरोग्य यंत्रणेत काम करण्यासाठी दि यश फाउंडेशनच्या नर्सिंग कॉलेजमधून प्रत्येक वर्षी 100 विद्यार्थी सज्ज होतात. कोरोनामुळे दि यश फाउंडेशनच्या नर्सिंग कॉलेजमध्ये नवीन अभ्यासक्रमाबाबत ऑनलाइन मार्गदर्शन, दूरध्वनीवरून माहिती दिली जाते. येथे बेसिक बी. एस्सी नर्सिंग (4 वर्षे डिग्री अभ्यासक्रम), ए. एन. एम. नर्सिंग (2 वर्षे डिप्लोमा अभ्यासक्रम), जी. एन. एम. नर्सिंग (3 वर्षे डिप्लोमा अभ्यासक्रम), पोस्ट बेसिक बी. एस्सी. नर्सिंग (2 वर्षे डिग्री अभ्यासक्रम), एम. एस्सी. नर्सिंग (2 वर्षे अभ्यासक्रम अभ्यासक्रम) या अभ्यासक्रमांची माहिती इच्छुकांना दिली जात आहे. शासन मान्यताप्राप्त जिल्हास्तरीय सर्वसाधारण योजना किमान कौशल्य विकास योजनेअंतर्गत बेडसाईड असिस्टंट हा अभ्यासक्रमही येथे सुरू आहे.
अधिक माहितीसाठी Email : yashnursing@yahoo.co.in, mobile no- 8600302454, 9423291863, 7776090333 या क्रमांकावर संपर्क साधावा.