
पर्ससीन जाळ्यांच्या सहाय्याने मासेमारी करणाऱ्या नौकांचे नूतनीकरण बंद
अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीने केलेल्या मागणीची दखल घेत पर्ससीन नौकांची संख्या कमी करण्यासाठी पर्ससीन जाळ्यांच्या सहाय्याने मासेमारी करणाऱ्या नौकांचे नूतनीकरण न करण्याचे आदेश राज्याचे मत्स्यव्यवसाय आयुक्त अतुल पाटणे यांनी संबंधित यंत्रणेला दिले आहेत.आदेशानंतरही एकाही पर्ससीन नौकांच्या परवान्याचे नूतनीकरण केल्याचे निदर्शनास आल्यास, पर्ससीन नौकांची संख्या कमी करण्याच्या कार्यवाहीत टाळाटाळ केल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित परवाना अधिकारी तथा सहायक मत्स्यव्यवसाय आयुक्त यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल असा इशाराही राज्याचे मत्स्यव्यवसाय आयुक्त श्री. पाटणे यांनी दिला आहे.
www.konkantoday.com