
३० जूनपर्यंत कोणत्याही बदल्या करण्यात येऊ नयेत सामान्य प्रशासन विभागाचे आदेश
राज्यातील कोरोनाचा Corona Virus वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता ३० जूनपर्यंत कोणत्याही बदल्या करण्यात येऊ नयेत असे आदेश सामान्य प्रशासन विभागानं काढले आहेत. सरकारच्या सेवेत असलेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या दर ३ वर्षांनी केल्या जातात. मात्र सध्या कोरोना संकटामुळे मंत्रालयातील कर्मचाऱ्यांवर ताण आहे. त्यामुळे ३० जूनपर्यंत कोणत्याही बदल्या न करण्याचा अध्यादेश काढण्यात आल्या आहेत. त्यामुळे पुढील दीड महिना तरी रुटिन बदल्या होणार नाहीत.
www.konkantoday.com