*पालवणीकरांची चिंता मिटली, शिमग्यासाठी परळ डौली एस् .टी. सेवा सुरू*

(वार्ताहर: परळ :- गणेश नवगरे) कोकणातील सर्वात मोठा सण म्हणून शिमगा सण साजरा केला जातो. चाकरमानी हा चाकरीसाठी महाराष्ट्राच्या राजधानीत मुंबईत जाऊन आपला उदरनिर्वाह करीत असतो. पण शिमगोत्सवानिमित्त चाकरमानी हा आपोआपच गावातील ओढीमुळे गावाकडे जाण्यास तयार होतो पण जाण्यासाठी गाडीचे काय? हे ओळखून पालवणी एसटी प्रेमी सुभाष गुजर व सामाजिक कार्यकर्ता गणेश नवगरे यांनी परेल एस.टी. आगारात जाऊन परळ डौली सुरु करण्याचे पञ परळ येथील वरीष्ट आगार प्रमुख नितीन चव्हाण यांची प्रत्यक्षात कार्यालयात भेट घेऊन दिले. तेव्हा वरिष्ठ आगारप्रमुख नितीन चव्हाण म्हणाले गाडी सुरू होईल परंतु प्रवासी कमी मिळतात, पुरेसा भारमान नाही त्याचे काय? त्यावर सुभाष गुजर म्हणाले गाडी सुरू करा पुढच आम्ही बघु प्रवाशांची संख्या आम्ही वाढवण्यास समर्थ आहोत आणि ही गाडी आमच्यासाठी फायदेशिर आहे. सकाळी सहा वाजता गावी जाण्यासाठी गाडीत बसलो तर मुबंईला येण्यासाठी तर सोमवारी कामावर जाण्यासाठीही फायद्याची आहे. हे ऐकुन वरीष्ट आगार प्रमुख नितीन चव्हाण यांनी २२ मार्च पासुन शिमगा सुरू होण्यापुर्वी एस.टी. पुर्व नियोजित आरक्षणासहीत एस.टी. सुरू होणार आहे. याची खात्रीच दिली आहे. त्यामुळेच पालवणी एसटी प्रेमी सुभाष गुजर व सामाजिक कार्यकर्ता गणेश नवगरे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button