
*मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे हे उपस्थित राहण्यापूर्वीच मुख्यमंत्र्यांचे फ्लेक्स बोर्ड फाडल्याने पोलिसांची धावपळ*
____शिवजयंती निमित्त किल्ले शिवनेरी ( ता. जुन्नर ) येथे शिवरायांच्या जन्मसोहळ्यास मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे हे उपस्थित राहण्यापूर्वीच मुख्यमंत्र्यांचे फ्लेक्स बोर्ड फाडल्याने शिवजयंती सोहळ्यास गालबोट लागले.सर्वत्र कडक पोलीस बंदोबस्त असताना फ्लेक्स फाडले गेल्याने पोलिसांची एकच धावपळ उडाली. तर, मुख्यमंत्री शिंदे येण्यापूर्वीच फाडलेले सर्व फ्लेक्स काढण्यास भाग पडले. दरम्यान, मराठा क्रांती मोर्चा आंदोलकांनी मराठा आरक्षणासाठी होत असलेल्या दिरंगाईचा निषेध व्यक्त करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना शिवनेरीवर पाय ठेवून देणार नाही, असा इशारा दिला होता. त्या अनुषंगाने फ्लेक्स फाडून मराठा आंदोलकांनी निषेध व्यक्त केला की काय? याची तपासणी पोलीस प्रशासन करत आहे.www.konkantoday.com