
चिपळूण गुहागर मार्गावर टेम्पोची धडक बसून दुचाकीस्वार ठार.
गुहागर येथून चिपळूणच्या दिशेने जाणाऱ्या दुचाकीस्वारांना टेम्पो ने धडक दिल्याने दुचाकी वरील सौरभ अनिल घोरपडे हा तरुण जागीच ठार झाल्याची घटना गुहागर मार्गावर उंब्रली येथे घडली हे तरुण दुचाकीवरून रात्री नऊच्या सुमाराला येत असता टेम्पो चालक रत्नाकर यादव याने त्यांच्या दुचाकी ला धडक दिली या अपघातात सौरभ याचा जागीच मृत्यू झाला त्यामुळे संतप्त झालेल्या काही जणांनी टेम्पो जाळून टाकला या अपघाताप्रकरणी टेम्पो चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे