
*चिपळूण भाजप पदाधिकारी ठरले बडे कुटुंबीयांसाठी देवदूत*
___कोकणात फिरण्यासाठी आलेल्या व पुन्हा पुणे-भोसरीकडे जाण्यासाठी निघालेल्या एका कुटुंबातील बालकाला गुरूवारी वाहतूककोंडीत अडकलेल्या वाहनातच चक्कर आली. यामुळे नातेवाईक महिलांनी आरडाओरडा केल्यानंतर भाजप पदाधिकारी परिमल भोसले व संदेश भालेकर यांनी धाव घेत बालकाला भोसले यांच्या कारमध्ये घेवून रूग्णालयात दाखल केले. वेळेवर उपचार मिळाल्याने हे बालक शुद्धीवर आले. त्यामुळे हे दोघे बालकांसाठी देवदूत ठरले.शिवान बडे (२ वर्षे, पुणे-भोसरी) असे या बालकाचे नाव आहे. बडे कुटुंबिय फिरण्यासाठी आले होते. ते गुरुवारी सायंकाळी पुण्याकडे जाण्यास निघाले असता त्यांचे वाहन बहाद्दूरशेख नाका येथे झालेल्या वाहतूककोंडीत अडकले. बराच वेळ कोंडी सुटत नव्हती. दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. असे असताना शिवान याला चक्कर आली. त्यामुळे तो निपचित पडला. हा प्रकार पाहताच त्याच्या दोन नातेवाईक महिलांनी आरडाओरडा केली. हा प्रकार भोसले व भालेकर यांच्या लक्षात येताच ते आपल्या वाहनातून उतरले व बडे यांच्या वाहनाकडे धावले. त्यांनी वाहतूक कोंडीतून मार्ग काढत छोट्या बालकाला रुग्णालयात दाखल केले www.konkantoday.com