*किसान सन्मान’ची ११६४ शेतकऱ्यांकडून वसुलीआयकर दात्यांसह शासकीय कर्मचाऱ्यांचा समावेश*
_______पंतप्रधान किसान सन्मान योजनेंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये दिले जात आहेत.मात्र, या योजनेचा लाभ काही आयकर दाते तसेच शासकीय कर्मचारी घेत असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील ५ हजार ४१५ जणांकडून हे पैसे वसूल करण्यात येणार आहेत. त्यापैकी आतापर्यंत १ हजार १६४ जणांनी १ कोटी ४६ लाख ६० हजार रुपये परत केले आहेत. उर्वरित शेतकऱ्यांकडील रकमेची अद्याप वसुली सुरू आहे.पंतप्रधान किसान योजनेंतर्गत चार महिन्यांनी दोन हजार रुपये म्हणजेच वर्षभरात शेतकऱ्यांना सहा हजार रुपये पेन्शन देण्याची योजना केंद्र शासनाने २०१९ साली सुरू केली. जिल्ह्यात या योजनेचे २,६९,०८३ लाभार्थी आहेत. मात्र, या योजनेचा लाभ शेतकऱ्यांऐवजी आयकर दाते आणि शासकीय कर्मचारी घेत असल्याचे निदर्शनात आल्याने अशांकडून घेतलेल्या निधीची रक्कम भरून घेण्याची कारवाई सुरू आहे. यापैकी आयकर दाते असलेल्या ४८८४ लाभार्थ्यांकडून आतापर्यंत २६,००३ हप्ते भरण्यात आले आहेत. उर्वरित अपात्र शेतकऱ्यांकडील वसुलीबाबत पाठपुरावा सुरू आहेwww.konkantoday.com