रत्नागिरी नगर परिषदविकसित भारत संकल्प यात्रा रोड मॅप
रत्नागिरी नगर परिषद येथे विकसित भारत संकल्प यात्रेच्या अभियान रथाचे आगमन
भारत सरकारने विकसित भारत संकल्प यात्रा या नावाची देशव्यापी मोहिम दिनांक १९ फेब्रुवारी २०२४ ते दिनांक २२ फेब्रुवारी २०२४ या कालावधीमध्ये सकाळच्या सत्रामध्ये ९.०० ते ११.०० व संध्याकाळच्या सत्रामध्ये ५.०० ते ७.०० या वेळेमध्ये राबविणार आहे. भारत सरकारच्या फ्लॅगशिप योजनांचे लाभ लाभार्थ्यांपर्यंत वेळेत पोहोचण्याच्या उद्देशाने विकसित भारत संकल्प यात्रा ही मोहिम आखण्यात आली आहे. या मोहिमेमध्ये विविध योजनांतर्गत पात्र असलेल्या परंतु आता पर्यंत लाभ न घेतलेल्या लोकांपर्यंत प्रसार आणि योजनांबद्दल जागरूकता निर्माण करणे, सरकारी योजनांचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांशी संवाद साधणे, या मोहिमेदरम्यान संभाव्य लाभार्थ्यांची नोंदणी करणे इ. उद्दिष्टे साध्य करावयाची आहेत.
या विकसित भारत संकल्प यात्रेमध्ये शहरी भागात केंद्र शासनाच्या विविध विभागाकडील पीएम स्वनिधी योजना, पीएम आवास योजना, पीएम उज्वला योजना, पीएम स्वच्छ भारत अभियान (शहरी) योजना, आयुष्यमान भारत योजना, पीएम सुरक्षा बीमा योजना, मुद्रा लोन, डिजीटल पेमेंट इन्फ्रास्ट्रक्चर इ. शासनाच्या विविध योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम या माध्यामातून केले जाणार आहे.
तसेच या अभियान यात्रेच्या माध्यमातून नागरिकांना केंद्र शासन, नगरविकास विभाग व इतर विभागातील विविध योजनांची माहिती देण्यात येणार आहे. या योजना लोकांपर्यंत पोहोचाव्या आणि योजनेचा प्रसार व प्रचार व्हावा व नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी हा मुख्य उद्देश या अभियानाचा राहणार असलेचे रत्नागिरी नगर परिषदेमार्फत सांगितले असून नागरिकांनी व लाभार्थ्यांनी मोठया संख्येने उपस्थित राहून जास्तीत जास्त प्रमाणात अभियानात सहभागी होवून योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे. रत्नागिरी नगर परिषद कार्यक्षेत्रातील विकसित भारत संकल्प यात्रेतील अभियानाच्या रथाच्या आगमनाचे ठिकाण, वेळ व दिनांक खालीलप्रमाणे आहे.
१. दिनांक १९.०२.२०२४ : कोंकण नगर: जिल्हा परिषद २१ नंबर शाळा, सकाळी:९.०० ते ११.००
२. दिनांक १९.०२.२०२४ : क्रांती नगर : महालक्ष्मी मंदिर समोर, संध्याकाळी : ५.०० ते ७.००
३. दिनांक २०.०२.२०२४ : शनिवार आठवडा बाजार:औदुंबर हॉटेल समोर, सकाळी : ९.००ते ११.००
४. दिनांक २०.०२.२०२४ : राजिवडा : फिशरीज हायस्कूल येथे, संध्याकाळी : ५.०० ते ७.००
५. दिनांक २१.०२.२०२४ : मारुती मंदिर : सावरकर नाट्यगृह परिसर, सकाळी : ९.०० ते ११.००
६. दिनांक २१.०२.२०२४ :माळनाका :नगरपरिषद व्यायामशाळा येथे, संध्याकाळी:५.०० ते ७.००
७. दिनांक २२.०२.२०२४ : मुरुगवाडा : शाळा क्रमांक २० येथे, सकाळी : ९.०० ते ११.००
८. दिनांक २२.०२.२०२४ :झाडगाव: नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे, संध्याकाळी:५.०० ते ७.००
www.konkantoday.com