
लोटे येथील प्रिव्ही कंपनीला लागलेलय आगीप्रकरणी व्यवस्थापनातील चौघाजणांवर गुन्हा दाखल
खेड: खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीत असलेल्या प्रिव्ही या रासायनिक कंपनीला लागलेल्या आगीप्रकरणी कंपनी व्यवस्थापनातील चौघांच्या विरोधात खेड पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. १७ एप्रिल २०२२ रोजी पहाटे ३:३० वाजण्याच्या सुमारास या कंपनीला भीषण आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले होते.
खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीत कारखान्यांना आग लागणे, रिऍक्टरचा स्पॉट होणे, वायू गळती होणे अशा घटना वारंवार घडतच असतात १७ एप्रिल २०२२ रोजी पहाटे ३. ३० वाजण्याच्या सुमारास या औद्योगिक वसाहतीत अशीच एक दुर्घटना घडली होती. या वसाहतीतील प्रिव्ही या रासायनिक कारखान्याला भीषण आग लागून लाखो रुपयांची हानी झाली होती. लोटे औद्योगिक वसाहतीतील प्लॉट नंबर सी. ३९ वर ही कंपनी असून कारखाना व्यवस्थापनाच्या हलगर्जीपणामुळे ही दुर्घटना घडल्याची तेव्हा चर्चा होती.
या दुर्घटनेचा पोलीसतपास सुरु होता. या दरम्यान प्रिव्ही ऑरगॅनिक लिमिटेड या कंपनीला लागलेली भीषण आग कंपनीच्या व्यवस्थापकांनी कच्च्या मालाची साठवणूक योग्य प्रकारे न केल्याने लागल्याचे चौकशीत उघड झाले होते. त्यानुसार पोलिसांनी कच्चा माल साठवून ठेवताना योग्य खबरदारी न घेतल्याचा ठपका ठेवत कंपनीचे प्लॉट मॅनेजर, सेफ्टी ऑफिसर सह चार जणांवर भादंवि कलम २८४,३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे
या प्रकरणी जितेंद्र घाणेकर यांनी दिलेल्या फिर्यादी नुसार प्रिव्ही कंपनीचे प्लांट मॅनेजर अबिद अहमद अली , सेफ्टी ऑफिसर यश संदीप बुटाला , स्टोअर डिपार्टमेंट इन्चार्ज रोहित कांबळे , कृष्ण तटकरे या चौघाजणांवर भादंवि कलम २८४.३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
www.konkantoday.com