
रत्नदुर्गवरील श्रीदेवी भगवती नवरात्रौत्सवाची जय्यत तयारी
महाराष्ट्रभर प्रसिद्ध असलेली रत्नागिरीतील रत्नदुर्ग किल्ल्यावरील निवासीनी श्री देवी भगवतीचा नवरात्रौत्सव येत्या १५ ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. १५ ऑक्टोबर ते २४ ऑक्टोबर २०२३ या दरम्यान उत्सवात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
१५ ऑक्टोबर ते २४ ऑक्टोबर २०२३ रोजी पर्यंत हा उत्सव सुरू राहणार आहे. उत्सव कार्यक्रम याप्रमाणे राहिल. १५ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वा. घटस्थापना होईल. १५ ते २३ ऑक्टोबर २०२३ या कालावधीमध्ये दररोज सायंकाळी ४ ते ७ वाजेपर्यंत भजन आणि कीर्तन कार्यक्रम. २२ ऑक्टोबर रोजी महाप्रसाद, दुपारी १२ ते २ वाजेपर्यंत. २३ ऑक्टोबर रोजी श्री देवी भगवतीचा घट दुपारी १२ वाजता उठेल व रात्री १२ वाजता देवीचा गोंधळ आणि तटप्रदक्षिणा (आराबा) होईल. २४ ऑक्टोबर रोजी (दसरा) सायंकाळी ५ वाजता सोने लुटणे कार्यक्रम होईल.
तसेच मंदिरात दररोज सायंकाळी ५.३० वाजता आणि सायंकाळी ८.३० वा. नित्यआरती होईल. अशा प्रकारे नवरात्र उत्सव कार्यक्रम साजरा होणार आहे. तरी समस्त भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री देवी भगवती मंदिर पब्लिक ट्रस्ट आणि उत्सव कमिटी सदस्य यांच्याकडून करण्यात आले आहे. www.konkantoday.com