*देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नामुळे हतबल झालेल्या कुटुंबियांना आधार देऊन एका आईला आपल्या लेकीला अखेरचा निरोप देता आला*.

______युद्धजन्य युक्रेनमध्ये शिकायला गेलेल्या रायगड जिल्ह्यातील प्रचिती पवार नावाच्या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. युद्धस्थ परिस्थितीत अडकलेल्या देशात निधन झालेल्या आपल्या लेकीच्या पार्थिवाचे दर्शन तरी घेता येईल का ?काळजीने तिची आई कासावीस झाली होती. प्रयत्नांची शर्थ करून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रचितीचा मृतदेह भारतात येईल अशी व्यवस्था केली. त्यानंतर शोकाकुल कुटुंबीयांनी फडणवीसांचे आभार मानले आहेत.प्रचिती पवार मूळची रायगड जिल्ह्यातील रोहा येथे राहणारी मुलगी. तिचे वडील मुंबई पोलीस दलात होते. दहा वर्षांपूर्वी त्यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. युक्रेन येथे एमबीबीएसच्या चौथ्या वर्षात ती शिकत होती. केसपुळीचे निमित्त झाले आणि सेफ्टीक होऊन तिचा 2 फेब्रुवारी रोजी मृत्यू झाला. आई देवयानी पवार आणि मामा डॉ.तेजकुमार अपनगे असा तिचा परिवार आहे. मुलीचे अंत्यदर्शन तरी होते की नाही या काळजीने आईच्या डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते. लेकीला एकदा शेवटचे पाहता यावे अशी एकच इच्छा त्यांची होती. अशात एका परीचीताने देवेंद्र फडणवीस यांना SMS करून परिस्थिती कळवली.देवेंद्र फडणवीसांना याविषयीची माहिती मिळाल्यावर त्यांनी तातडीने दखल घेतली. प्रचिती पवारचे पार्थिव भारतात आपल्या पातळीवर प्रयत्न सुरू केले. खासगी सचिव राजूरकर आणि दिल्लीतील स्विय सहाय्यक मनोज मुंडे यांना फडणवीसांकडून सूचना करण्यात आल्या. मिळालेल्या माहितीनुसार फडणवीस स्वतः परराष्ट्र राज्यमंत्री व्ही .मुरलीधरन यांच्याशी बोलले. परराष्ट्र मंत्रालय आणि युक्रेनमधील भारतीय दूतावास यांच्याशी संपर्क साधण्यात आला. प्रचितीचे पार्थिव मायदेशी घेऊन येण्याचे ऑपरेशन हाती घेण्यात आले. याबाबतचे प्रत्येक अपडेट देवेंद्र फडणवीस व्यक्तिशः जाणून घेत होते. आवश्यक त्या सूचना करत होते. सर्व अडचणी दूर होऊन प्रचितीचे पार्थिव मुंबई विमानतळावर पोहोचले. फडणवीस यांनी रुग्णवाहिकेची व्यवस्था केली. भाजप सोशल मीडियाचे प्रदेश सहसंयोजक प्रकाश गाडे त्यावेळी विमानतळावर हजर होते. तेथून प्रचितीचे पार्थिव 14 फेब्रुवारी रोजी रोहा येथे पोहोचविण्यात आले. काल तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button