
*रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये ठाकरे गटाचे विनायक राऊत विरुद्ध नारायण राणे अशी लढत होण्याची शक्यता*
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना उमेदवारी मिळाल्याने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची संधी हुकली आहे. मात्र, आता रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून राणे यांची उमेदवारी पक्की मानली जातेय.गेल्या काही आठवड्यांपासून राणे लोकसभा लढविण्याचे संकेत देण्यात येत होते. राज्यसभेच्या उमेदवारांच्या घोषणेनंतर त्यावर जवळपास शिक्कामोर्तब झाले आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये ठाकरे गटाचे विनायक राऊत विरुद्ध नारायण राणे अशी लढत होण्याची शक्यता आहे.शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी काही दिवसांपूर्वी राणे यांनी लोकसभा निवडणूक लढवण्यासंदर्भातील विधान जाहीरपणे केले होते. तरीसुद्धा राज्यसभेच्या उमेदवारीसाठी राणे प्रयत्नशील होते. मात्र, अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे त्यांची उमेदवारी भाजपने नक्की केली, त्यामुळे आपोआपच राणे यांचा पत्ता कट झाला आहे.रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून महायुतीकडून उद्योगमंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांनी मोर्चेबांधणी सुरू केली होती. वातावरण निर्मितीबरोबरच राजकीय पातळीवरही त्यासाठी ते विविध आघाड्यांवर प्रयत्नशील होते.www.konkantoday.com