
रेल्वेच्या प्रवाशांना महाराष्ट्रात एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाता येणार नाही.
महाराष्ट्र सरकारने आंतरजिल्हा प्रवासाला बंदी घातल्याने रेल्वेच्या प्रवाशांना महाराष्ट्रात एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाता येणार नाही. यामुळे येत्या १ जूनपासून प्रवास करणार्या महाराष्ट्रातील प्रवाशांना बाहेरच्या राज्यांत जाता येईल. परंतु राज्यातील दुसर्या जिल्ह्यात मात्र जाता येणार नाही.
महाराष्ट्रात आंतरजिल्हा किंवा आंतरराज्यात प्रवास करण्याची मुभा नाही.यासंदर्भात राज्य सरकारने रेल्वेला कळविले आहे. राज्य सरकारच्या या भूमिकेनंतर रेल्वे मंत्रालयाने परिपत्रक जारी करून महाराष्ट्रातील प्रवाशांची रेल्वेची तिकिटे रद्द करण्याच्या सूचना रेल्वे प्रशासनाला दिल्या आहेत. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे रेल्वे प्रशासनाला तिकिटे रद्द करावी लागत आहेत. या परिपत्रकात म्हटले आहे की, महाराष्ट्र सरकारने आंतरजिल्हा प्रवासाला बंदी घातल्याचे कळविले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातून सुटणार्या किंवा महाराष्ट्रातील शहरात थांबा असलेल्या सर्व रेल्वे प्रवाशांची तिकिटे रद्द करण्यात येत आहे. याचा परिणाम अन्य राज्यात जाणार्या प्रवाशांवर होणार नसल्याचे रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाºयाने स्पष्ट केले. महाराष्टातील कोणत्याही जिल्ह्यातून दुसºया राज्यात जाण्यासाठी प्रवासी नेहमीप्रमाणेच तिकिटांचे बुकिंग करू शकतात.
ज्या प्रवाशांची तिकीटे रद्द होतील, त्यांना तिकिटांची संपूर्ण रक्कम परत केली जाणार असून तसे प्रवाशांना एसएमएसद्वारे कळविण्यात येत आहे.
www.konkantoday.com