
*शिंदे गटाकडून माजी खासदार मिलिंद देवरा यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर*
__भाजपापाठोपाठ शिवसेनेच्या शिंदे गटाकडून माजी खासदार मिलिंद देवरा यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. देवरा यांना शिंदे गट दक्षिण मुंबईतून लोकसभेची उमेदवारी देणार असल्याची चर्चा होती.परंतु, शिंदे गटाने त्यांना राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यसभेच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा उद्या, गुरुवारी शेवटचा दिवस आहे. अशातच विविध पक्षांकडून उमेदवारांची घोषणा होत आहे. महायुतीतील भाजप, शिवसेना (शिंदे गट) यांच्या उमेदवारांच्या नावांची घोषणा झाली आहे. दरम्यान, भाजपनं महाराष्ट्रातून राज्यसभेसाठी अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी आणि डॉ. अजीत गोपछडे यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे महायुतीकडून आतापर्यंत चार उमेदवारांची घोषणा झाली आहे.www.konkantoday.com