
कोणत्याही उद्योग किंवा कंपनीने कोरोना वर्षात डिग्री मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना नोकरी देताना भेदाभेद केला तर कारवाई- नामदार उदय सामंत
कोरोना संकटात परीक्षा देऊन उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना नेहमी सारखीच डिग्री मिळणार आहे. त्यात कोणतेही बदल नसल्याचे उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले. त्यामुळे कोरोना संकटात डिग्री मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांच्या डिग्रीकडे कोणीही नकारात्मक दृष्टीकोनातून पाहू नये, असे आवाहन सामंत यांनी केले आहे.
कोणत्याही उद्योग किंवा कंपनीने कोरोना वर्षात डिग्री मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना नोकरी देताना भेदाभेद केला, तर महाराष्ट्र सरकार त्या उद्योग व्यवसायावर कारवाई करेल असा इशाराही त्यांनी दिला.
www.konkantoday.com