
*जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभाग**जिल्हास्तरीय हिवाळी क्रीडा स्पर्धा 15, 16 फेब्रुवारीला
**रत्नागिरी, दि. 13 (जिमाका) – जिल्हा परिषद शिक्षण विभाग (प्राथमिक) विभागाच्या जिल्हास्तरीय हिवाळी क्रीडा स्पर्धा 15 व 16 फेब्रुवारी रोजी श्री. विठठलराव जोशी चॅरिटेबल ट्रस्ट स्पोर्टस अॕकॅडमी, डेरवण ता. चिपळूण येथे आयोजित करण्यात आल्या आहेत. पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते गुरुवार 15 फेब्रुवारी रोजी सकाळी 8.30 वाजता स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे.* 15 फेब्रुवारी रोजी पहिल्या दिवशी मोठा गट मुले/मुली यांच्या सांघिक व वैयक्तिक क्रीडा स्पर्धा घेण्यात येतील. दुस-या दिवशी 16 फेब्रुवारीला लहान गट मुले/मुली यांच्या सांघिक व वैयक्तिक स्पर्धा होतील. तरी, जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड झालेल्या सर्व स्पर्धकांनी व मार्गदर्शक शिक्षकांनी दोन्ही दिवशी वेळीच उपस्थित रहावे. क्रीडा स्पर्धेसाठी जिल्हास्तरावर येताना दरवर्षा प्रमाणे एस.टी.च्या सवलतीच्या दराने तिकीटानुसार खर्च प्रदान करण्यात येणार आहे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) सुवर्णा सावंत यांनी कळविले आहे. 000