![](https://konkantoday.com/wp-content/uploads/2024/01/IMG-20240122-WA0017.jpg)
*रस्ता दुरूस्ती न झाल्यास मतदानावर बहिष्कार*______
खेड:- खेड तालुक्यातील तळे-म्हसोबावाडी मार्गावर जाणारा रस्ता २०२२ परतीच्या पावसात पूर्णपणे खचून पुरती दैनावस्था झाली आहे. तेव्हापासून आतापर्यंत रस्ता पूर्णतः नादुरूस्त असून वाहन चालवणे जिकरीचे झाले आहे. निवडणुकीपूर्वी या रस्त्याची दुरूस्ती न झाल्यास मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे. तसे निवेदनही जिल्हाधिकार्यांना देण्यात आले आहे.मागीलवर्षी झोळीचीवाडी फाट्यापासून म्हसोबावाडीच्या रस्ता दुरूस्तीसाठी ६० लाख रूपये मंजूर झाल्याचा फलक लावण्यात आला होता.www.konkantoday.com