*रत्नागिरीचा यश गोगटे सप्रे स्मृती अतिजलद बुद्धिबळ स्पर्धेचा विजेता*के. जी. एन. सरस्वती फाउंडेशन तर्फे आयोजन : २०१३ पासून सलग दहावी स्पर्धा
__रत्नागिरी : भारताचे पहिले राष्ट्रीय बुद्धिबळ विजेते (कै.) रामचंद्र सप्रे यांच्या नावाने रत्नागिरीत सलग दहाव्या वर्षी खुल्या जलद व अतिजलद बुद्धीबळ स्पर्धा केजीएन सरस्वती फाऊंडेशनतर्फे आयोजित करण्यात आल्या. रत्नागिरीच्या यश गोगटे ह्याने अग्रमानांकित मंदार लाड, ओंकार कडव, रवींद्र निकम यांच्यासारख्या मातब्बर खेळाडूंवर मात करत विजेतेपद काबिज केले तर मंदार लाड याला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. तांत्रिक सहकार्य चेसमेन रत्नागिरी संस्थेने केले. राणी लक्ष्मीबाई सभागृहात या स्पर्धा झाल्या. यामध्ये महाराष्ट्र, कर्नाटक व गोव्यातील फिडे मानांकित, बिगर मानांकित असे एकूण १११ खेळाडू सहभागी झाले.या स्पर्धेचे बक्षीस वितरण ज्येष्ठ क्रीडापटू, चेसमेनचे अध्यक्ष प्रसन्न आंबुलकर, ज्येष्ठ करसल्लागार चंद्रकांत हळबे, केजीएन सरस्वती फाउंडेशन व कऱ्हाडे ब्राह्मण संघाचे अध्यक्ष माधव हिर्लेकर, अभ्यंकर-कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालाचे निवृत्त उपप्राचार्य डॉ. श्रीकृष्ण जोशी, सौ. ऋचा जोशी आदींच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.या स्पर्धेत मुंबई, सांगली, सतारा, कोल्हापूर, पुणे, गोवा, कर्नाटक येथून स्पर्धकांनी सहभाग घेतला. यापैकी ४० हून अधिक खेळाडू आंतरराष्ट्रीय फीडे गुणांकन प्राप्त खेळाडू होते. जलद व अतिजलद स्पर्धेत मिळून आयोजकांकडून एकूण एक लाखांची बक्षिसे देण्यात आली. स्पर्धेत मुख्य पंच म्हणून विवेक सोहानी, चैतन्य भिडे यांच्यासोबत दीपक वायचळ, आरती मोदी आणि सूर्याजी भोसले यांनी काम पाहिले.स्पर्धेचा सविस्तर निकाल असा- यश गोगटे विजेता, (गुणानुक्रमे) मंदार लाड उपविजेता , किरण पंडितराव, सोहम खसबरदार, अभिषेक पाटील, प्रवीण सावर्डेकर, माधव देवस्थळी, ओंकार कडव, राहुल पवार, सौरिश कशेळकर, सुश्रुत नान, ओंकार सावर्डेकर, रवींद्र निकम, यश खेर, ऋषीकेश कबनुरकर, साहस नारकर, सार्थक साबळे, संतोष सरीकर, विठ्ठल मोरे, चिन्मय होमकर. १३०१ ते १६०० मानांकनामध्ये- वरद पेठे, विवेक जोशी, प्रदीप कुलकर्णी, मंगेश मोडक, मिलिंद नरवणकर. १००० ते १३०० मानांकनामध्ये- गोवर्धन वासावे, मोहसीन सय्यद, राजेंद्र साळवी. सर्वोत्कृष्ट बिगरमानांकित- अंशुमन शेवडे, विशाल आंबेकर, मनिष चोडणकर, मानस महाडेश्वर, शिवप्रसाद कोकणे. १५ वर्षांखालील गट- हर्षवर्धन भिंगे, अर्जुन साळुंखे, अरीन कुलकर्णी, प्रणव मोरे, आर्यन धुळप. १३ वर्षांखालील गट- अथर्व तावरे, अरिना मोदी, सिद्धी बुबने, विपिन सावंत, यश काटकर. ११ वर्षांखालील गट- सहर्ष टोकळे, आयुष रायकर, राघव पाध्ये, स्पर्श लव्हाळे, साची चाळके. ९ वर्षांखालील गट- समर्थ गोरे, अर्णव गावखडकर.www.konkantoday.com