
दीड वर्षांपूर्वी उदय सामंत यांच्या गाडीवर ओरखडा काढणाऱ्या शिवसैनिकांना वेगळे कलम तर निखिल वागळे यांचेवर प्राण घातक हल्ला करणाऱ्यांना वेगळे कलम-उपनेत्या सुषमा अंधारे यांनी टीका
निर्भय बनो’ या कार्यक्रमानिमित्त ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे शुक्रवारी पुण्यात गेले होते. मात्र भाजपा कार्यकर्त्यांनी हा कार्यक्रम उधळून लावण्याचा प्रयत्न केलात्यांनी निखिल वागळे यांच्या गाडीवरही हल्ला केला होता. याप्रकरणी दोन गुन्हे दाखल झाले आहेत. त्यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी टीका केली आहे.
पुण्याच्या साने गुरुजी हॉलमध्ये निर्भय बनो कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाआधी निखिल वागळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल आक्षेपार्ह ट्वीट केल्याप्रकरणी पुणे भाजपच्या तक्रारीवरून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच हा कार्यक्रम उधळून लावू असाही इशारा दिला होता. मात्र भाजपाने कार्यक्रमास विरोध केल्यास आपण या कार्यक्रमास सुरक्षा पुरवू, अशी भूमिका महाविकास आघाडीने घेतली होती. शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्या नेतृत्वाखाली भाजपाकडून आंदोलन करण्यात आले. तसेच निखिल वागळे यांच्या गाडीवर भाजपाकडून हल्ला करण्यात आला. यावेळी झालेल्या झटापटीत काही जण जखमी झाले. त्यात महिलांचाही समावेश होता.यावरून सुषमा अंधारे यांनी सुमारे दीड वर्षांपूर्वी पुण्यात राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्याचा संदर्भ देत राज्य सरकारवर टीका केली आहे. उदय सामंत यांच्या गाडीवर छोटासा ओरखडा उठला, तेव्हा शिवसैनिकांवर भादंवि 307, 353, 323 इतर 9 गुन्हे नोंदवले होते. पण निखिल वागळे यांची गाडी फोडून प्राणघातक हल्ला झाला. त्यांच्यावर फक्त 324 कलमान्वये गु्न्हा दाखल करण्यात आला आणि या सर्वांना पुरस्कार म्हणून लगेच जामीन देण्यात येत आहे, असे सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे.
www.konkantoday.com