
रत्नागिरीतील मिरजोळे एमआयडीसी येथील कंपनीकडून गरजूंची कोट्यावधींची फसवणूक
रत्नागिरीतील मिरजोळे एमआयडीसी येथील कंपनीकडून गरजूंची कोट्यावधींची फसवणूक झाली असल्याचा प्रकार घडला आहे. मात्र याबाबत अद्याप कोणतीही तक्रार दाखल झालेली नाही. रत्नागिरीतील मिरजोळे एमआयडीसी येथे काही महिन्यांपूर्वी आलेल्या कंपनीने व्यवसायाच्या नावाखाली अनेकांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आकर्षक मार्केटींग करून या कंपनीने लोकांमध्ये विश्वास निर्माण केला. यानंतर आपले इप्सित साध्य होताच या कंपनीच्या संचालक मंडळाने रत्नागिरीतून पोबारा केला. यामुळे फसवणूक झालेले गुंतवणूकदार हवालदिल झाले आहेत. या प्रकरणी काहींनी पोलिसांत तक्रार केल्याचेही सांगण्यात आले.नुकत्याच रत्नागिरीत आलेल्या या तथाकथित कंपनीने आमिष दाखवण्यास सुरूवात केली. रत्नागिरीतील एमआयडीसीत एका कंपनीने अनेकांची रक्कम थकवल्याची घटना आता उघडकीस आली आहे. यामध्ये फसगत झाल्याचे लक्षात येताच अनेकांनी पोलिसांकडे धाव घेतली आहे. आज ग्रामीण पोलिसांनी या कंपनीत भेट दिल्याचीही माहिती मिळत आहे. उद्योग उभारण्यासाठी आवश्यक सामग्री देतो, असे सांगत अनेकांकडून लाखो रुपये घेवून या कंपनीचे संचालक आता गायब झाल्याचे बोलले जात आहे. येथे उपस्थित असणारा कर्मचारीवर्ग येथे पैसे परत मागायला आलेल्यांच्या रोषाला बळी पडत आहे. या कंपनीचे तीनही संचालक सध्या फोन उचलत नाहीत. कंपनीतील कर्मचारीवर्गाच्या मागे लागल्यावर एखाद दुसर्याला केवळ पुढील तारखेचा चेक देण्यात येतो. मात्र असे देण्यात आलेले चेक देखी न वटल्याने अनेक गुंतवणूकदार चिंतेत आहेत.www.konkantoday.com