
रत्नागिरी जिल्ह्यातील शिक्षकांच्या लसीकरणासाठी चांगला प्रतिसाद, ८५ टक्क्यांपेक्षा अधिक लसीकरण पूर्ण
रत्नागिरी जिल्ह्यातील शिक्षकांच्या लसीकरणासाठी चांगला प्रतिसाद लाभत असून ८५ टक्क्यांपेक्षा अधिक लसीकरण पूर्ण झाले आहे
कोरोनामुळे गेले दीड वर्षे ऑनलाइन अध्यापन सुरू आहे. कोरोनामुक्त गावातून शाळा सुरू करण्याची सूचना केली होती. त्यानुसार जिल्ह्यातील ६० शाळांमध्ये प्रत्यक्ष अध्यापन सुरू झाले असून, ५,१२१ विद्यार्थी उपस्थित राहत आहेत.सध्या गणेशोत्सवाची सुट्टी असली तरी १५ सप्टेंबरपासून पुन्हा वर्ग भरणार आहेत.
जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या हळूहळू कमी होत आहे. त्यामुळे शासनाने कोराेनामुक्त गावातून शाळा सुरू करण्याची सूचना केली होती. शिवाय शिक्षकांचे शंभर टक्के लसीकरण पूर्ण करण्याची सूचना केली आहे. जिल्ह्यातील एकूण ३२०२ शाळांपैकी अवघ्या ६० शाळा सुरूआहेत
www.konkantoday.com