*अतिरिक्त लोटे औद्योगिक वसाहतीत जाळरेषा रोखतेय वणवे*____
खेड:– अतिरिक्तत लोटे औद्योगिक वसाहतीलगत परिसरातील वणवे रोखण्यासाठी वनविभागाने ११४ हेक्टर क्षेत्रातील जमिनीवर जाळरेषा मारल्या असून यासाठी निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामुळे परिसरात वळणे लागले तरी वनसंपदेची कमीत कमी हानी होत असून फळझाडे वाचवण्यात यश येत आहे. गेल्या ३ वर्षापासून जाळरेषेचा पॅटर्न यशस्वी होत असल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आले.
अतिरिक्त लोटे औद्योगिक वसाहतीलगत मेटे, आयनी, असगणी परिसरातील ११४ हेक्टर क्षेत्र वनविभागाच्या ताब्यात आले. वनविभागाकडून या वनक्षेत्रात विविध प्रकारची रोपेही लावली आहेत. या परिसरात गवताचे प्रमाण सर्वाधिक असल्याने बिबटयासह विविध वन्यप्राण्यांचा संचारही असतो. उन्हाळ्याच्या उष्णतेमुळे बर्याचवेळा वणवे लागण्याचे प्रकार घडतात. तर अनेकदा अनोळखी ग्रामस्थ जाणीवपूर्वक वणवे लावत असल्याच निदर्शनास आले आहे.या वणव्यांमुळे वनसंपदेची मोठी हानी होवून वन्यप्राणी देखील पळून जात होते. परिसरातील वणवे रोखण्यासाठी विविध उपाययोजनांचा अवलंब करूनही उशिरा मिळणार्या वणव्यांच्या माहितीमुळे वनसंपदेची राखरांगोळी होत होती. या पार्श्वभूमीवर वणवे नियंत्रणात आणण्यासाठी विभागीय वनाधिकारी दीपक खाडे यांच्या आदेशानुसार वनपाल सुरेश उपरे यांनी अतिरिक्त एमआयडीसीतील वनक्षेत्रात जाळरेषा मारण्याचा निर्णय घेतला. गेल्या ३ वर्षापासून येथे जाळरेषा मारण्यात येत आहेत.जाळरेषघ मारताना जंगलातील रस्त्यांच्या कडेचे गवत काढून टाकले जात असून एक ते दीड कि.मी. लांबीच्या आडव्या तिडव्या जाळरेषा साकारण्यात येत आहेत. यामुळे भडकणारा वणवा जाळरेषेपर्यंत येवून थांबत असल्याने वणवे दूरपर्यंत पसरत नाहीत. www.konkantoday.com