*अभिषेक घोसाळकरवर* *गोळ्या मॉरिसने चालवल्या की आणखी कुणी चालवल्या?-**उद्धव ठाकरे यांचा सवाल*

________मुंबईत ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. यामध्ये अभिषेक घोसाळकर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. अभिषेक हे माजी आमदार विनोद घोसाळकर यांचे पुत्र आहेत.दरम्यान, हल्लेखोर मॉरिसनेही स्वत:वर गोळ्या झाडून आत्महत्या केली आहे. यावरून उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. पूर्वी गँगवॉर दोन गटांमध्ये व्हायचं, आता सरकारमध्ये गँगवॉर सुरू आहे असं म्हणत निशाणा साधला आहे.”अभिषेक घोसाळकरवर गोळ्या मॉरिसने चालवल्या की आणखी कुणी चालवल्या? त्या दोघांनाही मारण्याची सुपारी आणखी कुणी दिली होती का?” असा सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारला आहे. “अभिषेक घोसाळकर यांची हत्या करण्यात आली. मात्र ज्याने हत्या केली त्यानेही नंतर आत्महत्या केली. हे प्रकरण जेवढं दिसतंय तेवढं सोपं दिसत नाही आहे. सूड भावनेतून माणूस अत्यंत टोकाचं पाऊल उचलतो. त्याने टोकाचं पाऊल उचललं असेल तर त्याने आत्महत्या का केली हा प्रश्न राहतो.”www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button