
समुद्रातील वादळी परिस्थितीचा मुंबई व रायगड येथील मच्छिमारी नौकाना फटका : २५० नौका जयगडात आश्रयाला
रत्नागिरी : शासनाने ३१ जुलैनंतर मच्छिमारीवरील बंदी उठविल्यानंतर अनेक मच्छिमारांनी समुद्रातील वादळी वातावरणामुळे आपल्या मच्छिमारी नौका समुद्रात उतरविल्या नव्हत्या. मात्र मुंबई, रायगड येथील काही मच्छिमारांनी धोका पत्करुन आपल्या नौका समुद्रात उतरवल्या परंतु मच्छिमारी करताना प्रतिकुल परिस्थिती निर्माण झाल्याने या मच्छिमारी नौकांना जयगड बंदरात आश्रय घ्यावा लागला आहे. जयगड बंदरात जवळ जवळ २५० नौका आश्रयाला आल्या आहेत. त्यामुळे स्थानिक मच्छिमारांच्यात काही प्रमाणात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या नौका आश्रयाला आल्याचे सहाय्यक मत्स्य आयुक्तांनी मान्य केले आहे. ११ ऑगस्टपर्यंत हायअलर्ट असल्याने या नौकांना बंदरात उभे करू दिले जाणार आहे. मात्र या नौकांवर असलेले मासे उतरविण्यास मज्जाव करण्यात आला आहे.
www.konkantoday.com