*महाराष्ट्रातील प्राथमिक शाळांच्या वेळा बदल्या*

_महाराष्ट्रातील प्राथमिक शाळांच्या वेळा बदलण्यात आल्या असून चौथीपर्यंतचे वर्ग सकाळी ९ नंतर भरणार आहेत. विद्यार्थ्यांच्या स्वास्थासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे. सरकारच्या निर्णयानुसार आता चौथीपर्यंतचे वर्ग सकाळी ९ नंतर भरणार आहेत.काही दिवसांपूर्वीच राज्यपालांनी राज्यातील शाळांच्या वेळा बदलण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार आता हा निर्णय घेण्यात आला आहे. खरं तर चौथीपर्यंतचे वर्ग आता ७ नव्हे तर ९ नंतर भरणार आहेत.दरम्यान, प्राथमिक शाळांची वेळ सकाळी ९ नंतर असावी असे राज्यपालांनी सुचवले होते. त्यानुसार राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांनी पूर्व प्राथमिक ते इयत्ता चौथीपर्यंतचे वर्ग सकाळी ९ किंवा ९ वाजेनंतर भरवण्याबाबतचा निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांची पूर्ण झोप होत नाही त्यामुळे त्यांना मानसिक त्रास सहन करावा लागतो या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button