*अडीच वर्षात जे वर्षाची माडी उतरू शकले नाहीत. मग ते माझ्या दाढीपर्यंत कसे पोहोचणार?, – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी साधला उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा*
__मला मुख्यमंत्रिपदाला चिकटून राहायचं असतं तर बसू शकलो नसतो का? मला कळलं नव्हतं का माझे आमदार फुटत होते? त्यांना पकडून हॉटेलमध्ये टाकू शकलो नसतो का? या मिंद्याचं काय, उचलून त्याची दाढी खेचून कुठूनही आणलं असतं, असं विधान माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलं होतं.कोकण दौऱ्यावर असताना अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर निशाणा साधला होता.उद्धव ठाकरेंच्या या टीकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. कोकणातील सभेत मला दाढी खेचून आणले असते म्हणाले होते, मात्र गेल्या अडीच वर्षात जे वर्षाची माडी उतरू शकले नाहीत. मग ते माझ्या दाढीपर्यंत कसे पोहोचणार?, असा सवाल एकनाथ शिंदेंनी विचारला. तसेच शिवसेनेचा धनुष्यबाण हा प्रभू रामचंद्राचा आणि हिंदुत्वाचा धनुष्यबाण असून या धनुष्यबाणाने वेध घेऊन आपल्याला अहंकाराची, मगृरीची आणि गर्वाची मशाल कायमस्वरूपी विझवायची असल्याचे मत एकनाथ शिंदेंनी व्यक्त केले.www.konkantoday.com