
लायन्स क्लबच्या झोनल चेअरमनपदी श्री.सुजय मेहता यांची निवड
दापोलीः– (वार्ताहर)ज्ञानदीप शिक्षण संस्थेचे संचालक श्री.सुजय मेहता यांची लायन्स क्लबचे झोनल चेअरमन म्हणून निवड झाली असून सदर निवड एक वर्षासाठी आहे.
या झोनमध्ये लायन्स क्लब ऑफ दापोली, लायन्स क्लब ऑफ चिपळूण, लायन्स क्लब ऑफ सावर्डे व लायन्स क्लब ऑफ चिपळूण गँलेक्सी या संस्था समाविष्ट आहेत. त्याचे नेतृत्व झोन चेअरमन श्री.सुजय मेहता यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले आहे. यावेळी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर एम.जे.एफ. श्री.रविंद्र देशपांडे, रिजन चेअरमन श्री.नितीन गांधी, लायन्स क्लब दापोलीचे अध्यक्ष श्री.ऋषिकेश भागवत यांनी निवड करण्यात आली आहे.
ज्येष्ठ लायन सदस्य डॉ.प्रशांत मेहता, ला.श्रीराम माजलेकर, ला.आशिष मेहता, ला.मंदार केळकर, ला.प्रसाद मेहता, ला.प्रमोद तलाठी, ला.फजल रखांगे आदींनी नूतन पदाधिकाऱ्याना शुभेच्छा दिल्या.
www.konkantoday.com