*सेवानिवृत्त पोलिस इंस्पेक्टर प्रदीप शर्मा यांच्या घरी आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापा*
_सेवानिवृत्त पोलिस इंस्पेक्टर प्रदीप शर्मा यांच्या घरी आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकल्याची मोठी बातमी समोर आली आहे. त्यांच्या घरी आज आयकर विभागाने छापा टाकल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, एका माजी आमदाराच्या प्रकरणामध्ये ही कारवाई सुरु असल्याची माहिती मिळत आहे. आयकर विभागाकडून या प्रकरणात काही ठिकाणी सर्च ऑपरेशन सुरु आहे.प्रदीप शर्मा हे मनसुख हिरेन प्रकरणातील आरोपी आहेत. ते वर्षभरापासून अधिक काळ जेलमध्ये होते. त्यानंतर नुकतंच त्यांना सुप्रीम कोर्टातून जामीन मंजूर झाला होता. ते जामिनावर बाहेर होते. त्यांचं अंधेरी आणि आणखी एका ठिकाणी निवासस्थान असल्याची माहिती मिळत आहे. या सगळ्या प्रकरणात आयकवर विभागाची छापेमारी सुरु आहे. प्रकरण नेमकं काय आहे याबाबतची सविस्तर माहिती अद्याप समजू शकलेली नाही. पण सूत्रांकडून याबाबत प्राथमिक माहिती मिळाली आहे की, प्रदीप शर्मा यांच्या घरी आयकर विभागाची टीम दाखल झाली आहे. तिथे सर्च ऑपरेशन सुरु आहे.