
*रायगड मतदारसंघातूनच लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरणार-खासदार सुनील तटकरे*
____राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटातर्फे राज्यसभा निवडणुकीसाठी एक उमेदवार राहणार आहे. परंतु या निवडणुकीत आपण निवडणूक लढणार नसून आपल्या रायगड मतदारसंघातूनच लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांनी स्पष्ट केले.येत्या २७ फेब्रुवारीला राज्यसभेच्या ६ जागांसाठी निवडणूक होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडून खासदार सुनील तटकरे यांना उमेदवारी दिली जाईल व रायगड लोकसभा मतदारसंघ भाजपसाठी सोडला जाईल, अशी चर्चा होती.या चर्चेला विराम देताना खासदार तटकरे म्हणाले, राज्यसभा निवडणूक लढण्याचा आपला कोणताही विचार नसून रायगड लोकसभा मतदारसंघातूनच निवडणूक लढविणार आहे. या मतदारसंघात आपण विकासाचे काम केले असून या भरवशावर आपण निवडणुकीत नक्कीच विजय संपादन करू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.www.konkantoday.com