*महासंस्कृती महोत्सवानिमित्त 12 फेब्रुवारी ला जिल्हास्तरीय चित्रकला व निबंध स्पर्धा*
*रत्नागिरी, दि. 7 (जिमाका) : महासंस्कृती महोत्सवानिमित्त जिल्हास्तरावर होणाऱ्या महासंस्कृती महोत्सवानिमित्य शालेय स्तरावर निबंध व चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत यांनी दिली. या संदर्भात सर्व गट शिक्षणाधिकाऱ्यांना पत्र पाठवले आहे. प्राथमिक व माध्यामिक दोन्ही स्तरांवर सर्व शाळांमध्ये दिनांक 12 फेब्रुवारी 2024 सकाळी 10 ते 11 या वेळेत स्पर्धा घेऊन प्रत्येक विषयाचे तालुकास्तरीय तीन क्रमांक ( चित्र व निबंधासहित ) दिनांक 13 फेब्रुवारी दुपारी 12 वाजेपर्यंत जिल्हास्तरावर पाठविण्यात यावे. चित्रकला स्पर्धा (सर्व माध्यमांसाठी)विषय – महाराष्ट्रातील सण व उत्सव, महाराष्ट्रातील लोककला/लोकधारा, महाराष्ट्रातील ऐतिहासिक गडकिल्ले गट – 5 ते 7 पहिले 3 क्रमांक (चित्रासह) व गट ते 8 ते 10 पहिले 3 क्रमांक (चित्रासह) इयत्ता 11 वी ते 12 वी च्या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा या विषयावर 500 शब्दांमध्ये निबंध स्पर्धा पहिले 3 क्रमांक (निबंधासह) अशी आहे. चित्रकला स्पर्धेची माहिती विहित नमुन्या सोबत घेऊन येण्याबाबत म्हटले आहे.www.konkantoday.com