*पेपर फोडणं आता महागात पडणार, 1 कोटीचा दंड आणि तुरुंगवास*
___आता पेपर फुटीसंदर्भात कठोर कारवाई ही केली जाणार आहे. फक्त दंडच नाही तर पेपर फुटी केल्यावर थेट शिक्षा देखील भोगावी लागणार आहे. या विधेयकानुसार साधा दंड नसून पेपर फुटी करणाऱ्याला तब्बल 1 कोटी रूपयांचा दंड हा भरावा लागणार आहे.पेपर फुटीच नव्हे तर परीक्षा देणाऱ्या उमेदवाराच्या जागी जर दुसऱ्या कोणी परीक्षा देत असेल तर त्याच्याविरोधात देखील कठोर कारवाई ही केली जाणार आहे.लोकसभेत 5 फेब्रुवारी 2024 रोजी हा पेपर फुटीचा विधेयक मांडण्यात आलाय. हा विधेयक केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी मांडला आहे. जर एखादा व्यक्ती हा पेपर फुटीमध्ये दोघी आढळला तर त्याला तब्बल 10 वर्षांची जेल होणार आहे आणि 1 कोटी रूपये दंड भरावा लागणार. पेपर फुटीसंदर्भात कठोर भूमिका घेताना केंद्र शासन दिसत आहे.फक्त हेच नाही तर पेपर फुटीमध्ये एखादी संस्था सहभागी असेल तर त्या संस्थेला परत परीक्षा घेण्याचा सर्व खर्च हा उचलावा लागेल आणि कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल. म्हणजेच काय तर पेपर फुटीमध्ये शाळेचा किंवा महाविद्यालयाचा सहभाग आढळून आला तर कठोर कारवाईला संस्थेला सामोरे जावे लागेल.www.konkantoday.com