
*चोरट्यांचा छडा लावणार्या पोलिसांचा विश्वस्तांच्यावतीने सत्कार*
___रत्नागिरी शहरातील मारूती मंदिर सर्कल परिसरात श्री मारूती मंदिरातील दानपेटीवर डल्ला मारणार्या विजय रमनेवल प्रजापती (रा. कोकणनगर, मूळ उत्तरप्रदेश) या संशयिताला रत्नागिरी शहर पोलिसांनी अवघ्या काही तासात अटक केल्याने मारूती मंदिर विश्वस्तांनी पोलिसांचा शाल, श्रीफळ देवून सत्कार केला.यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांच्यासह पोलीस निरीक्षक महेश तोरसकर, परबकर, शहर पोलीस उपनिरीक्षक आकाश साळुंखे, हेडकॉन्स्टेबल राहुल जाधव, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दीपक साळवी, हे. कॉं. संतोष सावंत, अरूळ चाळके, अमोल भोसले, राहुल जाधव, भालचंद्र मयेकर, अनुजा कांबळे, अमित पालव यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी डॉ. श्रीधर ठाकूर, ट्रस्टचे सचिव संतोष तावडे, शिरीष बामणे, संतोष मुळये, राधाकृष्ण गांधी, श्रीराम जाधव, सचिन जोशी आदी विश्वस्त उपस्थित होते.www.konkantoday.com