*महावितरणच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत रत्नागिरी कल्याण परिमंडळाची चमकदार कामगिरी*

__कोकण परिमंडळ: महावितरणच्या आंतरपरिमंडळीय राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा छत्रपती संभाजीनगर येथे 1 ते 4 फेब्रुवारी दरम्यान संपन्न झाल्या. या स्पर्धेत रत्नागिरी कल्याण परिमंडळाच्या संयुक्त संघाने सांघिक व वैयक्तिक क्रीडा प्रकारात 3 सुवर्ण व 7 रौप्यपदके पटकावित चमकदार कामगिरी केली. कबड्डीत विजेतेपदाचा बहुमान मिळविला.सांघिक क्रीडा प्रकारात कबड्डी (पुरूष) हा संघ विजेता तर क्रिकेट (पुरुष) हा संघ उपविजेता ठरला. टेबल टेनिस सांघिक (महिला) रंजना तिवारी, प्राची ठाकरे व अश्विनी साळवे यांनी रौप्यपदक पटकावले. वैयक्तिक क्रीडा प्रकारात लांब उडीत अमित हुमणे, बुध्दिबळात रंजना तिवारी यांनी सुवर्णपदके पटकावली. 100 व 200 मीटर धावणे मेघा जुनघरे, भालाफेकीत हर्षला मोरे, टेबल टेनिस एकेरी रंजना तिवारी, टेबल टेनिस दुहेरी अविनाश पवार व अशोक बामगुडे यांनी रौप्यपदके पटकावली.विजेत्या संघ व खेळाडूंचे मुख्य अभियंता मा. श्री. परेश भागवत, अधिक्षक अभियंता (रत्नागिरी मंडळ) मा. श्री. स्वप्नील काटकर, अधिक्षक अभियंता (सिंधुदुर्ग मंडळ) मा. श्री. विनोद पाटील, अधिक्षक अभियंता (पायाभूत आराखडा) मा. श्रीमती कल्पना पाटील, सहाय्यक महाव्यवस्थापक (मानव संसाधन) मा. श्री. वैभव थोरात, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी मा. श्री. अप्पासाहेब पाटील यांनी अभिनंदन केले आहे. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button