उद्यापासून भाजपच्या गाव चलो अभियानाचा शुभारंभ**गाव चलो अभियानाच्या माध्यमातून नरेंद्र मोदी यांच्या कार्याची यशोगाथा गावा गावात पोहचवणार:सचिन वहाळकर*
* *रत्नागिरी:* पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली 2014 ते 2024 या दहा वर्षाच्या काळात केंद्र सरकारने देशात सर्वच क्षेत्रात प्रचंड गीने विकास केला असून गरीब कल्याण,महिल सशक्तीकरण,देशाची अंतर्गत आणि बाह्य सुरक्षा अनेक क्षेत्रात उत्तम कामगिरी करत आंतरराष्ट्रीय पातळीवरही देशाचे नाव उंचावले आहे.मोदी सरकारला भाजपाशासित अनेक राज्य सरकारांनीही चांगली साथ देत आपआपल्या राज्यात मोठा विकास करून घेतला आहे.आगामी लोकसभा निवडणुकीच्यादृष्टिने केंद्र व राज्य सरकारांची यशोगाथा तळागाळापर्यंत पोहचवली पाहिजे याकरिता भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्या मार्गदर्शनाखाली गाव चलो अभियान दिनांक 4 फेब्रुवारी ते 11 फेब्रुवारी 2024 या कालावधीत संपूर्ण देशभर राबविण्यात येत आहे.याचाच भाग म्हणून रत्नागिरी जिल्हयातही हे गाव चलो अभियान उद्या दिनांक 4 फेबु्रवारी ते 11 फेबु्रवारी 2024 दक्षिण रत्नागिरी जिल्हयातील सर्व गावामध्ये राबविण्यात येणार आहे,अशी माहिती गाव चलो अभियानचे जिल्हा संयोजक सचिन वहाळकर यांनी दिली.गाव चलो अभियानच्या पत्रकार परिषदेला दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत,गाव चलो अभियानचे जिल्हा संयोजक सचिन वहाळकर,जिल्हा सरचिटणीस सतेज नलावडे,युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष ऋषिकेश केळकर, शहर सरचिटणीस मंदार खंडकर,जिल्हा प्रसिद्धी प्रमुख उमेश कुळकर्णी उपस्थित होते.ते पुढे म्हणाले की,या गाव चलो अभियानाच्या माध्यमातून गेल्या दहा वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून अनेक विकासाच्या योजना सर्वच गावात पोहचल्या आहेत याची यशोगाथा पोहचवण्यात येणार असून छोट्या छोटया वाड्यातूनही कार्यकर्ता पाठविला जाणार असून यांच्यामार्फत बूथसमिती बैठक,जनसंघापासून काम करण्यार्या तसेच भाजपाच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या भेटी घेणे,शाळेत जावून शिक्षकांबरोबर विद्यार्थ्यांचीही भेटी घेणे,युवकांच्या भेटी तसेच शेतकरी ,व्यवसायिक यांच्याहीसमूह बैठका घेणे, स्वयंसेवी संस्थांच्या कार्यकर्तेे,बचतगटांच्या प्रतिनिधी अंगणवाडी सेविका,आशासेविका,पोस्टमन,तलाठी यासारख्या स्थानिक कर्मचार्यांची भेट घेणे इ. अनेक कार्यक्रम या अभियानातून होणार आहेत.11 फेब्रुवारी हा पंडित दिनदयाळ उपाध्याय यांचा स्मृतीदिन असून त्यानिमित्ताने हे अभियान त्यांच्या स्मृतीला समर्पित केले आहे.www.konkantoday.com