- _रत्नागिरी तालुक्यातील टेंभ्ये धनगरवाडा रस्त्यावर दोन दुचाकींमध्ये झालेल्या अपघातात दोघेजण जखमी झाले. ही घटना सोमवारी रात्री ८ च्या सुमारास घडली. दीपक महादेव जोशी व गणेश मयेकर अशी जखमींची नावे आहेत. या अपघाताची नोंद रत्नागिरी ग्रामीण पोलिसांत करण्यात आली.पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दीपक महादेव जोशी (रा. चिंद्रवली खेडकुळीवाडी, रत्नागिरी) हे २९ जानेवारी २०२४ रोजी दुचाकी (क्र. एमएच ०८ झेड ३५७७) घेवून रत्नागिरी ते खेडकुळी असे जात होते. रात्री ८ च्या सुमारास ते टेंभ्ये धनगरवाडा येथील खोबरा आंबे येथे आले. यावेळी देवधे रस्त्याने येणार्या दुचाकीवरील (क्र. एमएच ०८ एटी ७०२०) चालक संशयित गणेश मयेकर यांनी निष्काळजीपणे दुचाकी चालवून दिपक जोशींच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यात दोन्ही गाड्यांचे नुकसान झाले. तसेच दोघेही स्वार जखमी झाले.www.konkantoday.com
Back to top button