
*अपघात करून फरारी झालेल्या फरारी इनोव्हा कारचालक ४८ तासातच जेरबंद*
__मुंबई-गोवा महामार्गावर रायगड जिल्ह्यातील महाड एमआयडीसी हद्दीतील नागावनजिक दुचाकीस धडक देवून पलायन केलेल्या इनोव्हा कारचालकास महाड पोलिसांनी अवघ्या ४८ तासातच जेरबंद केले. या अपघातात दुचाकीवरील पती-पत्नी गंभीररित्या जखमी झाले होते.नरेंद्र लक्ष्मण लाड (४५), मीरा नरेंद्र लाड (४०) हे दांपत्य दुचाकीवरून पोलादपूरच्या दिशेने जात असताना इनोव्हा कारचालकाने धडक दिली. पहाटेच्या सुमारास घडलेल्या घटनेनंतर इनोव्हा कारचालकाने जखमींना मदत न करता व पोलीस स्थानकात खबर न देताच पोबारा केला. या अपघातात गंभीररित्या जखमी झालेल्या दोघांनाही महाड रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र प्रकृती गंभीर बनल्याने अधिक उपचारासाठी मुंबई येथे दाखल करण्यात आले. अपघातानंतर महाड एमआयडीसीचया पोलिसांनी परिस्थितीची पाहणी करत पंचनामा केला. फरारी इनोव्हा कारचालकाच्या शोधार्थ सीसीटीव्ही फुटेज घेत कारच्या नंबरवरून तपास सुरू केला. त्यानुसार पालघर जिल्ह्यातून अनोव्हा कारचालकास महाड एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेतले. www.konkantoday.com