
ग्राहकांची योग्य माहिती घेऊनच सीएनी लेखापरीक्षण करावे : अभिजित केळकर
रत्नागिरी : सीए हे देश घडवणारे आहेत. त्यामुळे ग्राहकांची योग्य माहिती घेऊनच आपण लेखापरीक्षण करावे, असे प्रतिपादन सी. ए. इन्स्टिट्यूटच्या पश्चिम क्षेत्राचे कौन्सिल मेंबर अभिजित केळकर यांनी केले.
सीए इन्स्टिट्यूटच्या रत्नागिरी शाखेला भेट दिल्यानंतर वृंदावन सेमिनार हॉलमध्ये आयोजित संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी सीए इन्स्टिट्यूटच्या शाखेचे अध्यक्ष प्रसाद आचरेकर व्यासपीठावर उपस्थित होते. दिल्ली येथे बनावट इन्व्हॉईस प्रकरणी एका सीएवर कारवाई करण्यात आली. या प्रकारची काही प्रकरणे अन्य ठिकाणीही घडली आहेत. त्यामुळे कोकणच्या सर्व सीएंनी जबाबदारीने व काळजीपूर्वक लेखापरीक्षण करावे, अशी सूचना त्यांनी केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शैलेश काळे यांनी केले. माजी अध्यक्ष श्रीरंग वैद्य यांनी केळकर यांचे स्वागत तसेच माजी अध्यक्ष भूषण मुळ्ये यांनी सीए केळकर यांचा सत्कार केला. याप्रसंगी खजिनदार केदार करंबेळकर, अभिलाषा मुळ्ये आणि शैलेश हळबे यांच्यासह रत्नागिरीतील सीए उपस्थित होते.