सिंधुदुर्गात नांदगाव येथे कार आणि रिक्षाची समोरासमोर धडक*

  • . मुंबई-गोवा महामार्गावर कणकवली तालुक्यातील नांदगाव कोळंबा मंदिरासमोर नांदगावहून मुंबईकडे जाणा-या लेनवर कार आणि रिक्षाची समोरासमोर धडक बसल्याने अपघात झाला.यामध्ये रिक्षातील‌ एक प्रवासी गंभीर जखमी झाला असून रिक्षा चालकास किरकोळ दुखापत झाली आहे. दोन्ही वाहनांच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले आहे. हा अपघात गुरूवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास घडला. रोशन किरण गमरे, (मूळ रा.भायखळा मुंबई सध्या रा. नांदगाव) असे जखमी प्रवाशाचे तर मामुद अमीर काझी, (रा. असलदे, शिवाजी नगर) असे रिक्षा चालकाचे नाव आहे.याबाबत मिळालेली माहिती अशी की, जीप कॅम्पस ही चारचाकी घेऊन अथांग योगेंद्र सामंत (वय २८, रा.गंगापूर रोड, नाशिक) हे गोव्याहून मुंबईच्या दिशेने जात असताना याच लेनवर विरूद्ध दिशेने रिक्षा घेऊन चालक मामुद काझी हे नांदगाव येथून प्रवाशी रोशन गमरे याला घेऊन ओटव फाटा नजीक घेऊन जात असताना दोन्ही वाहनांची धडक झाली. या अपघातानंतर नागरीकांनी तात्काळ जखमी रिक्षा चालक व जखमी प्रवाशी याना कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलेwww.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button