*जि.प. शाळांचे १९,७९३ विद्यार्थी वाहतूक भत्यासाठी पात्र*
__केंद्र शासनाच्या बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा हक्क कायद्यांतर्गत राज्याच्या शहरी व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना वाहतूक सुविधा देण्यासाठी राज्यस्तरावरून गतीने कार्यवाही करण्यात आली आहे. राज्यातील १९ हजार ७९३ विद्यार्थ्यांना वाहतूक भत्ता देण्यासाठी पात्र ठरवण्यात आले आहे. तर राज्यातील ग्रामीण आणि शहरी क्षेत्रातील ३ हजार ३६४ वस्तीस्थाने निश्चित करण्यात आली आहेत.www.konkantoday.com