
विचारांची लढाई अन* *शाश्वत विकासाची हमी-**प्रशांत यादव
*_चिपळूण-संगमेश्वर मतदार संघातून शरद पवार गट राष्ट्रवादीकडून माझी उमेदवारी जाहीर झाली आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून पहिली उमेदवारी माझी जाहीर झाली, याचा आनंद आहे. माझ्या दृष्टीने आता ही विचारांची लढाई आहे. विचार असतील तर विकास नक्कीच होईल. सध्या खर्या अर्थाने महाराष्ट्रात जे काही राजकीय क्षेत्रात चुकीच्या पद्धतीने चाललं आहे, घटनेच्याविरोधात ज्या चुकीच्या गोष्टी घडत आहेत. सर्वच क्षेत्रात सुरू असलेल्या खेळखंडोबा यांना मोडीत काढणं, लोकशाही वाचविणं हे अत्यंत महत्वाचं आहे. शरद पवार साहेब व अन्य मंडळी यासाठी काम करीत आहेत. त्यांना साथ देण्यासाठी मी या लढाईत उतरलो आहे. अशी भावना वाशिष्ठी डेअरीचे चेअरमन, शरद पवार राष्ट्रवादीचे चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदार संघाचे उमेदवार प्रशांत यादव यांनी व्यक्त केली आहे.www.konkantoday.com