राज्य परिवहन निवृत्त कर्मचाऱ्यांचे रत्नागिरी विभागीय कार्यशाळेसमोर आंदोलन*
राज्य परिवहन निवृत्त कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न दीर्घकाळापासून प्रलंबित आहेत. याबाबत शासनाकडे पाठपुरावा करूनही महामंडळ व शासनाकडून दखल घेण्यात येत नाही. कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी राज्य परिवहन निवृत्त कर्मचारी संघटनेतर्फे सोमवार, दि.२९ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता आंदोलन करण्यात आलेसोमवारी (दि.२९ रोजी) आझाद मैदान (मुंबई) येथेही आंदोलन करण्यात आले. शिवाय प्रत्येक विभागीय कार्यालयासमोर संघटनेतर्फे निदर्शने करण्यात आली. त्यानुसार रत्नागिरी येथील राज्य परिवहन महामंडळाच्या विभागीय कार्यालयासमोर संघटनेतर्फे आंदोलन करण्यात आले. गेल्या तीन वर्षांपासून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांची अंतिम देयके अद्याप प्रलंबित आहेत, ती तातडीने अदा करण्यात यावीत. थकीत महागाई भत्ता, थकीत घरभाडे भत्ता तातडीने अदा करण्यात यावा. सर्व थकीत देण्यांवर आठ टक्के दराने व्याज देण्यात यावे.सेवेतून निवृत्त झालेल्या, राजीनामा दिलेल्या व वीस वर्षे सेवा करून बडतर्फ झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांना वर्षभर राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व गाड्यांमधून प्रवासासाठी विनाअट मोफत पास देण्यात यावा, पेन्शनमध्ये वाढ करावी, सेवानिवृत्तांच्या मुलांसाठी नोकरीत पाच टक्के आरक्षण देण्यात यावे यासह अनेकमागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले.www.konkantoday.com