*खेड-भोस्ते रेल्वेस्थानक मार्गावर अखेर मलमपट्टी*
खेड-भोस्ते रेल्वेस्थानक मार्गावर ग्रामसडक योजनेतून कोट्यावधी रुपयांचा निधी खर्चूनही मार्ग पुरता खड्ड्यातच गेला होता. जागोजागी पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांची अक्षरशः तारेवरची कसरत सुरू होती. या प्रश्नी उठलेली टीकेची झोड अन तालुका कॉंग्रेसच्या उपोषणाची गंभीर दखल घेत अखेर संबंधित खात्याला मार्ग सुस्थितीत आणण्यासाठ सवड मिळाली आहे. या मार्गावर केवळ पॅचेसचा मुलामा देत मलमपट्टी करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.www.konkantoday.com