
रत्नागिरी जिल्हा परिषदेतील रिक्त पदांच्या भरतीचा मार्ग आता अधिक सुकर झाला
पावसाळी अधिवेशनात उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री ना. अजितदादा पवार यांनी शासकीय, निमशासकीय कार्यालयातील महत्वाची रिक्त पदे तातडीने भरण्याचे आदेश दिले आहेत. ना. पवार यांच्या आदेशामुळे रत्नागिरी जिल्हा परिषदेतील रिक्त पदांच्या भरतीचा मार्ग आता अधिक सुकर झाला आहे.
शासकीय, निमशासकीय कार्यालयाने आपल्याकडील रिक्त पदांचा तपशील तात्काळ संबंधित विभागाकडे पाठवायचा आहे. गट अ, ब, क श्रेणीतील रिक्त पदे भरती प्रक्रियेद्वारे तात्काळ उपलब्ध करून दिली जाणार आहेत. एमपीएससीमार्फत भरण्यात येणार्या विविध संवर्गातील एकूण १५५११ रिक्त पदे भरती प्रक्रियेद्वारे भरण्याची घोषणा ना. अजितदादा पवार यांनी विधिमंडळात केली होती. सन २०१८ पासून रिक्त असलेली विविध विभागातील महत्वाची पदे प्राधान्याने भरली जाणार आहेत.
www.konkantoday.com