
मुंबई-गोवा महामार्गावर ओसरगाव येथे जळलेल्या अवस्थेत सापडलेला मृतदेह अंगणवाडी सेविकेचा.
कणकवली-मुंबई-गोवा महामार्गावर ओसरगाव येथे सोमवारी उत्तररात्री जळालेल्या स्थितीत आढळलेल्या महिलेची ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले आहे. सदर महिलेचा खून करून नंतर तिला पेट्रोल ओतून जाळण्यात आल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे.
सदरची महिला सावंतवाडी तालुक्यातील किनळे येथील अंगणवाडी सेविका सुचिता सुभाष सोपटे (५५) असल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी वेंगुर्ले टांक येथील ईतोरीन रुजाय फर्नाडिस (४८) या संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे.www.konkantoday.com