मुंबईमध्ये देखील किमान तापमानात मोठी घट
महाराष्ट्रात उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे हाडं गोठवणारी थंडी पडली आहे. मुंबईमध्ये देखील किमान तापमानात मोठी घट झाली. शहराच्या तुलनेत उपनगरांमध्ये जास्त थंडी जाणवतेय. राज्याच्या अनेक भागांमध्ये किमान तापमान 10 डिग्रीपेक्षा खाली गेलंय.शुक्रवारी जळगावात सर्वात कमी तापमान 8.8 डिग्री सेल्सियस नोंदवण्यात आलंय. निफाडसह महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये थंडीची लाट कायम आहे. महाराष्ट्रातील किमान तापमानात मोठी घसरण पाहायला मिळतेय. प्रदेशातील अनेक भागांमध्ये दाट धुकं पडलं आहे. विदर्भ, मराठवाड्याच्या अधिक भागांमध्ये किमान तापमान 10 डिग्री सेल्सियसच्या जवळपास होतं. हवामान विभागाने अंदाज वर्तवला की, राज्यात आणखी काही दिवस कडाक्याची थंडी कायम राहू शकते.
राज्यातील अनेक शहरांमध्ये तापमान हे 10 डिग्रीपेक्षा खाली आलंय. हवामान विभागाचा अंदाज आहे की, कमीत कमी आणखी दोन दिवस थंडी कायम राहील. पुणे आणि मुंबईत देखील वातावरण थंडच राहणारआहे. शुक्रवारी पुण्यातील पारा हा 10 डिग्री सेल्सियपर्यंत आला होता. मुंबईच्या सांताक्रूझ हवामान केंद्राने शुक्रवारी किमान तापमान 16.3 डिग्री सेल्सियसच्या जवळपास नोंदवण्यात आल्याची माहिती दिली. पुणे, जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, वर्धा, यवतमाळ आणि नागपूरात सर्वाधिक थंडी पडतेय. शुक्रवारी नाशकातील तापमान 9.8 डिग्री सेल्सियपर्यंत कोसळलं. थंडीसोबतच दाट धुक्यामुळेही लोक हैराण झाले आहेत. नाशिक जिल्ह्यातील निफाडमध्ये सर्वात जास्त थंडी पडली आहे.
www.konkantoday.com