गुगलनेही दिल्या भारताला 75व्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा; बनवलं खास डूडल!
भारत आज आपला 75 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या थाटामाटात साजरा करत आहे. गुगलनेही प्रजासत्ताक दिनानिमित्त डूडल बनवले आहे. ज्यामध्ये त्याने अनेक स्क्रीन दाखवल्या आहेत, ज्यामध्ये एक कलर आणि एक ब्लॅक अँड व्हाइटमध्ये परेड दाखवली आहे.गुगलने आधी दोन टीव्ही आणि नंतर एक मोबाईल दाखवला. हे डूडल वृंदा जावेरी यांनी बनवले आहे.
गेल्या वर्षी गुजरातमधील कलाकार पार्थ कोठेकर यांनी भारताच्या 74 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त गुगलचे डूडल तयार केले होते. डूडलला हँड कट पेपरच्या मदतीने तयार करण्यात आले होते. यात नवी दिल्लीतील कर्तव्य पथवर होत असलेले प्रदर्शन रेखाटले होते. डूडल कलाकृतीला खूपच बारकाईने हाताने कापलेल्या कागदापासून तयार करण्यात आले होते. डूडलमध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त परेडची झलक दिसत होती. यात राष्ट्रपती भवन, इंडिया गेट, सीआरपीएफ मर्चिंग दल, आणि मोटर सायकल सवार याचा समावेश करण्यात आला होता.
यंदाच्या वर्षी म्हणजेच 2024 ला 75 वा प्रजासत्ताक दिन साजरा केला जाणार आहे.
www.konkantoday.com